जुना वाद उफाळला! रामनगरात दोन गटांत जबर हाणामारी; दहा जणावर गुन्हे दाखल: तलवार, रॉडने जीवघेणा हल्ला

वर्धा : जुन्या वादातून दोन गटात तलवार, चाकू रॉडने तुंबळ हाणामारी झाली. यात दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना 26 डिसेंबर रोजी सांयकाळी 6.30 ते 7 वाजताच्या दरम्यान, शहरातील तुकाराम वार्ड, रामनगरात घडली. या प्रकरणात परस्परविरोधी दहा जणांविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

वाद सोडविण्याकरिता गेलेल्या 39 वर्षीय इसमावर पाच जणांनी तलवारीने हल्ला करून गंभीर जखमी करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना 26 डिसेंबरला सांयकाळी 6.30 ते 7 वाजताच्या दरम्यान रामनगरात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी खुशाल किसनराव राऊत (वय
39) रा. तुकाराम वॉर्ड, रामनगर वर्धा हे घराजवळ उभे असताना चारचाकी गाडीमध्ये विशाल बादलवार, अमोल गेडाम, तुषार बादलवार, सौरभ गावंडे व रिहांश राजपूत यांनी फिर्यादील तलवारीने व त्याचा भाऊ बंटी राऊत याला मारण्यास आले होते. फिर्यादी त्याच्यामध्ये झालेला वाद मिटविण्यासाठी गेला असता त्यांनी फिर्यादीला उजव्या हातावर दंडावर तलवारीने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. आणि पळून गेले. या प्रकरणी विशाल बादलवार, अमोल गेडाम, तुषार बादलवार, सौरभं गावंडे, रिहांश राजपुत सर्व रा. वर्धा यांच्याविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात नोंदविला आहे. अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here