

हिंगणघाट : ऑटोतून गावी जात असलेल्या महिलेच्या पर्समधील दागिने लंपास करण्यात आले. ही घटना नांदगाव ते चिंचोली रस्त्यावर घडली.याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली. स्वाती मंगेश मेश्राम ही ऑटोने गावी जात असताना ऑटोचालकाने तिची दागिने भरलेली बॅग ऑटोवर ठेवली. स्वाती ही चिंचोली येथे उतरली असता तिने पर्सची पाहणी केली मात्र, तीला 3० हजार किंमतीचे दागिने दिसून आले नाही. महिलेने याबाबत हिंगणघाट पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी कमलाकर सिताराम नराली यास अटक करून गुन्हा दाखल केला आहे. दिवसेंदिवस चोरींच्या घटनांनी डोकेवर काढले असून पोलिसांनी याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे.