
वर्धा : ‘आम्हांलापण दारू पाज’, असे म्हणून तिघांनी युवकाशी वाद घाळून काठीने मारहाण करीत जखमी केले. गौळ ते येरणवाडी रस्त्यावर ही घटना घडली. किशोर झोटिंग हा गौळ येथून पैसे घेऊन येरणवाडी येथे जात असताना त्यास सतीश खडसंगे, सुरेश खडसंगे, अविनाश पाटील यांनी रस्त्यात अडवून ‘आम्हांला दारू पाज’असे म्हणून ‘तू या रस्त्याने कसा काय आलास’? असे विचारून लाथाबुक्क्यांनी मारहाण तसेच! काठीने मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी अल्लीपूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

























































