

पवनार : गावात मोठ्या प्रमाणात डुकरांची संख्या वाढली असुन याचा नाहक त्रास गावकर्यांना सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासन व संबंधीत मालकास वारंवार विनंती करुनही कोणत्याच प्रकारची दखल घेतल्या जात नसल्याने यावर कायमस्वरुपी बंदोबंस्त करण्याची मागणी भीम टायगर सेनेच्या वतीने थेट जिल्हाधीकार्यांना निवेदनातुन करण्यात आली आहे.
गावातील एका व्यक्तीच्या मालकीच्या पाळीव डुकरांचा पवनार गावातील नागरीकांना गेल्या अनेक वर्षापासुन नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबद अनेकांनी तक्रारी केल्या मात्र याचा कोणताच फायदा झाला नाही. डुकरांच्या वाढत्या संखेमुळे परिसरात सगळीकडे कायम दुरगंधी पसरलेली असते परिणामी गावामध्ये आजार पसरत चाललेले आहे. अनेक वर्षापासून ग्रामस्त सहन करीत आहे. मात्र यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने आता ग्रामस्थांचा रोष वाढत चालला आहे. पवनार गाव होगणदारी मुक्त गाव आहे.
गावातील सर्वच नागरीकांकडे स्वच्छालय आहे. त्यामुळे पाळीव डुकरांची गावात काही गरज नाही त्यांच्यापासुन अनेक आजार पसरण्याची भिती निर्माण होत असल्याने डुकरांना कायमस्वरुपी गावा बाहेर काढण्यात यावे असे दिलेल्या निवेदनात म्हण्टले आहे. यावेळी भीम टायगर सेना वर्धा तालुका उपाध्यक्ष विशाल नगराळे याच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.