

सेलू : मोबाइल हिसकावल्याच्या किरकोळ वादातून मनात राग धरून एका युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी शहरात उघडकीस आली. बेलगाव येथील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह सकाळी विश्रामगृहाच्या मागील भागातील बोर नदीच्या पात्रात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रवीण योगीराज राऊत (२०) रा. बेलगाव, असे मृतकाचे नाव आहे.
तो गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबत शुक्रवारी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान शनिवारी सकाळी बोर नदीच्या पात्रात एका युवकाचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तपासादरम्यान नदीपात्रात सापडलेला मृतदेह प्रवीण राऊत याचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरुन तपास सुरु केला.
हत्येनंतर आरोपीने मृतदेह फेकला बोर नदीपात्रात
हत्या केल्यानंतर मृतदेह स्मशानभूमी परिसरातील बोर नदीचे डोहात फेकून दिल्याचेही सूरज याने सांगितले. या घटनेत आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. पुढील तपास सेलू पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक देवेंद्र ठाकूर, डीबी पथकातील्ल अपलदार अखिलेश गव्हाणे, मनोहर पुडे, सचिन वाटखेडे, विनायक घोडे यांनी नागपूरवरून आरोपीस ताब्यात घेतले. धानोलीचे पोलिस पाटील अमित लुंगे यांनी पंचनामा कामी सहकार्य केले. पुढील तपास सेलुचे पोलिस उपनिरीक्षक प्रितम निमगडे व त्यांची चमू करीत आहे.























































