

नाचणगाव : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाचनगाव येथील भीम जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित विदर्भस्तरीय बुद्ध-भीम गीत गायन स्पर्धेला थाटात सुरुवात झाली. नाचनगावच्या बुद्ध विहाराच्या पवित्र प्रांगणात, “आकाश मोजतो आम्ही भिमा तुझ्यामुळे” या जोरदार गीताने वातावरण भारावून गेले. या गीताच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या हृदयात ऊर्जा संचारली. गायक सुरज करोडे यांच्या आवाजातील जाज्वल्यता, आणि गीतातील भीमप्रेम, दोहोंची उत्तुंग एकजूट उपासितांच्या मनांमध्ये स्फुल्लिंग पेटवून गेली. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या सादरीकरणाचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भीम जयंती उत्सव समितीने विशेष तयारी केली असून, विदर्भातील अनेक गावांमधून स्पर्धक दाखल होत आहेत. बुद्ध-भीम गीत गायनाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर आणि बौद्ध संस्कृतीचा अभिमान प्रभावीपणे व्यक्त होत आहे. या उपक्रमास अनेक नामवंत मान्यवर उपस्थित राहणार असून, स्पर्धेचा अंतिम टप्पा आजच सायंकाळी पार पडणार आहे.