

पवनार : येथील अण्णाभाऊ साठे नगरात आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरोधात वस्ताद लहुजी साळवे यांनी बंड पुकारून आपल्या तालमीत अनेक क्रांतिकारक घडवून जगेल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी अस ठणकावून सांगणारे ते ऐक सच्चे देशभक्त होते. त्यामुळे त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याकरिता त्याच्या पुण्यतिथी निमित्त समाज बांधव एकत्रित येत त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारारपण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याची माहिती यावेळी समाजबांधवांना दिली.
यावेळी गोविंदा वानखडे, निलेश मुंगले, शेखर लोखंडे, अजय जाधव, मुन्ना वानखडे, नरेश मुंगले, भागीरथ वानखेडे, विशाल मुंगले, बालू गवळी, सुरेश आमटे, सोनू मुंगले, विठ्ठल पडघान, नरेश वानखेडे, सचिन वानखेडे, स्वप्नील मुंगले, अशोक लोखंडे, बालू पडघान, नितेश मुंगले, गोविंदा मुंगले, गजानन मुंगले, साजन खंडारे, गोलू गवळी, मधुकर मुंगले, बबलू पडघान, गुडू मुंगले, संजय गायकवाड, ताराबाई पडघान, संगीता मुंगले, मंगला मुंगले, इंदुबाई मुंगले, आशा लोखंडे, नंदा मुंगले यांची उपस्थिती होती.