पथनाट्याच्या सादरीकरणातून अपघाताविषयी जनजागृती ; रस्ते वाहतूकीचे नियम पाळण्याचे आवाहन

वर्धा : ३६व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने वाहन चालकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी याकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे. या वेळी आपल्या जीवासह इतरांच्याही जीवाची पर्वा (काळजी) करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. येथील उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाच्या परिसरात पथनाट्याच्या सादरीकरणातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मेघनासाने मोटर वाहन निरीक्षक प्रफुल मेश्राम, संदीप मुखे, अजय चौधरी, साधना कवळे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

या पथनाट्याच्या माध्यमातून बेजबाबदारपणे, विणाहेलमेट, अती वेगाने, दारु पिऊन, मोबाईल फोनवर बोलत दुचाकी चालविल्याने किती गंभीर परिणामाला सामोरे जावे लागते याचे बेजबाबदारपणे वाहने चालवल्याने कशाप्रकारे अपघात घडतात आणि कशाप्रकारे मृत्यू ओढू शकतो आणि यमदूत कशाप्रकारे आपल्याला आपल्या सोबत घेण्यासाठी येतात याचे सादरीकरण करण्यात आले. वाहन चालविताना आपल्या जीवाबरोबरच इतरांच्याही जीवाची कशी काळजी घेता येईल याविषयी जनजागृती यावेळी करण्यात आली अपघातामध्ये निधन झाल्यानंतर घरच्या कुटुंबीयांची कशी दैना अवस्था होते त्याच्या घरी कशी त्याचे कुटूंबीय वाट बघत असतात याचेही यावेळेस सादरीकरण करण्यात आले.

वेदांत बावनकर, दिव्या झा, शिवानी प्रीत सिंह, प्रेम शंकर झा, ऋषि राज शुक्ला, अशीष रंजन, मणिदीप मिश्रा, संभव कुमार, अनवरूल खान, गोरक्ष पोफली, आद्या मनीष तिवारी यांनी पथनाट्य सादर केले. यावेळी सहायक मोटर वाहन निरीक्षक विशाल भगत, अक्षय मालवे, आदित्य ढोक, अमर पखान, राहुल ढोबळे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here