ड्रग्जची वाहतूक करणाऱ्या युवकास ठोलल्या बेड्या ! हिंगणघाट येथील घटना : ६.४ ग्रॅम ड्रग्ज केले जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हिंगणघाट : कारमधून मेफेड्रॉन ड्रग्जची वाहतूक करताना एकाला अटक केली. ही कारवाई हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पोलिसांनी केली. नरेश हेमंतराव निकम (3४, रा. पिंपळगाव रोड, यवतमाळ, ह. मु. प्रगतीनगर, वणी), असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ६.४ ग्रॅम एमडी ड्रग्ज, कार, दोन मोबाइल, असा ५.१० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मंगळवारी रात्री गस्तीवर होते. दरम्यान, त्यांना एका पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी स्वीफ्ट डिझायर (एमएच २९ आर ५६१२) क्रमांकाच्या कारमधून 5४ वर्षे वयोगटातील एक व्यक्‍ती नागपूर येथून हिंगणघाट मार्गाने एमडी (मेफेड्रॉन) इर्ज अवैधरीत्या वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी नागपूर ते हैदराबाद मार्गावरील सरकारी दवाखाना ते नांदगाव चौककडे येणाऱ्या सर्व्हिस रोडवर नाकेबंदी केली. दरम्यान, संशयित कारला थांबवून वाहनाची झडती घेतली असता चालकाच्या सीट कव्हर खाली सहा प्लास्टिक पॅकेटमध्ये पांढर्‍या रंगाच्या पावडर स्पटिक स्वरूपात असलेला एमडी (मेफेड्रॉन) पावडर ६ ग्रॅम ४ मिली अवैधरीत्या मिळून आले.

याप्रकरणी चालक नरेश हेमंतराव निकम (रा. पिंपळगाव रोड, यवतमाळ, ह. मु. प्रगतीनगर, वणी) यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून एमडी (मेफेड्रॉन) पावडर, दोन मोबाइल, कार, असा (एकूण पाच लाख १० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस निरीक्षक मनोज गभणे, पोलिस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी मनोज धात्रक, हमीद शेख, अरविंद येनूरकर, श्रीकांत खडसे, राजेश तिवस्कर, गोविंद मुंडे, उदय सोलंकी, रितेश गेटमे व सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here