

पवनार : आगामी लोकसभा निवडणुका आणि सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात शांतता व सुव्यवस्था आबादीत रहावी यासाठी सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पवनार गावात शनिवारी (ता. १३) रूट मार्च काढण्यात आला. बसस्थान परिसर, ग्रामपंचायत कार्यालय, बाजार चौक, अन्नाभाऊ साठे वार्ड, सेवाग्राम रोड पर्यत हा रूट मार्च काढण्यात आला. यावेळी पोलिस उपअधीक्षक प्रमोद मकेश्वर, सेवाग्रामचे ठाणेदार विनित घागे, पोलिस उपनिरिक्षक शिवराज कदम, संतोष ढूमने, प्रकाश झाडे यांच्यासह २६ पोलिस कर्मचारी, २२ सैनिक, ६५ सीआयएसएफचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा या रूट मार्चमध्ये सहभाग होता.