

पवनार : देशाला स्वातंत्र मिळून पंच्याहत्तर वर्षे झालीत मात्र आजही या देशात शोषण व्यवस्था कायम आहे. गोर गरीबांच्या शिक्षणाची दारे बंद केल्या जात आहे. सर्वसामान्य जतेला न्याय मिळत नाही. पूर्वीचे गुलामीचे दिवस परत येणार आहे. त्यामुळे या शोषण व्यवस्थेच्या विरोधात अण्णाभाऊंच्या विचारातून लढा उभारण्याची गरज आहे असे विचार बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार यांनी पवनार येथे अण्णाभाऊ साठे जयंतीच्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
यावेळी माजी सरपंच अजय गांडोळे, भिम टायगर सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विशाल नगराळे, सामाजीक कार्यकर्ते नितीन कवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना श्री राईकवार म्हणाले की गरीब, कष्टकरी, वंचित समाजाचे दुःख, दैना, दारिद्र्य आपल्या लेखणीच्या माध्यमातून साहित्यात मांडणी करणारे प्रखर कवी, साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते. ‘ये आजा दी झूठी है। देश की जनता भूकी है। असा नारा १५ आगस्ट १९४७ ला देणाऱ्या अण्णाभाऊंचा विचार आजही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७५ वर्षे लोटली तरीही देशाची परिस्थिती बदलेली नाही. म्हणून अण्णाभाऊंच्या विचारातून समाज परिवर्तन होणे गरजेचे आहे. म्हणून त्यांच्या जयंती दिनी समाजाने आपल्या मुलांना शिक्षण देण्याचा संकल्प करून आंबेडकरी विचाराची, कास धरावी, त्यातूनच समाजाची प्रगती होईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी गोविंदा वानखेडे, जय मुंगले, विजय वानखेडे, राजू निखाडे, विशाल मुंगले, शेखर लोखंडे, वैभव निखाडे, भुषण मुंगले, अजय जाधव, अमोल गवळी, मुन्ना वानखेडे, विठ्ठल पडघान, निलेश मुंगले, शंकर खडसे, प्रशांत मुंगले, गुड्डू मुंगले, प्रशांत वानखेडे, सोनू मुंगले, साजन खंडाळे, वेदांत लोखंडे, वैष्णव गायकवाड, दादू लोखंडे, सचिव वानखेडे, नरेश मुंगले, रोशन मुंगले, विक्रांत खडसे, सौरभ स्वर्ग, गोचू आमटे, गजानन मुंगले, विजय बेंडे, ताराबाई पडघान, आशा गायकवाड, इंदूबाई मुंगले, सुधाबाई मुंगले, गीता पडघान, सुषमा स्वर्ग, स्वीटी लोखंडे, निकिता खडसे, मालाबाई मुंगले, शिला पडघान यांच्यासह मोठ्या संखेने समाजबांधवांची उपस्थिती होती.