
वर्धा : शहरातील बडे चौकात असलेल्या फर्निचरच्या दुकानाबाहेरील इलेक्ट्रिक मोटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ याची माहिती दुकानदाराला दिली. घटनेनंतर अग्निसुरक्षा सिलिंडरच्या साह्याने आग विझवण्यात आली. परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
निकल मंदिर रोडवर असलेल्या एंटरप्रायझेस नावाच्या फर्निचरच्या दुकानाचा दिसणारा भाग व त्यावर लाकूडकाम करण्यात आले आहे. दुकानाच्या बाहेरील विद्युत मीटर व ज्याची वायरिंग भूमिगत आहे. मंगळवारी सायंकाळी 5.15 च्या सुमारास विद्युत मीटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. त्यामुळे आग पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निसुरक्षा सिलिंडर घेऊन धाव घेत आग विझवली.


















































