

वर्धा : तेंदुपत्ता तोडण्यास गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.२४) सकाळी कारंजा (घाडगे) तालुक्यातील येनिदोडका शिवारातील जंगलात ही घटना घडली.
१० ते १२ महिला सकाळच्या सुमारास येनिदोडका जंगल शिवारात तेंदूपत्ता संकलित करण्यासाठी गेल्या होत्या. तेंदूपत्त्याच्या झाडावरून पाने तोडत असताना अचानक पट्टेदार वाघाने महिलांवर हल्ला चढविला. यामध्ये सुशीला भाऊराव मंडारी (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. वाघाने सोबत असलेल्या महिलेवरसुद्धा हल्ला केला. यात सविता रवींद्र मंडारी (वय २७) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना उपचाराकरीता नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.