

रोहणा : गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवून दोन वासरांना गतप्राण केले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. रोहणापासून अवघ्या १ किमी अंतरावर असलेल्या सायखेडा या शेतशिवारात घडलेल्या या घटनेमुळे पशुपालक व शेतकरी, तसेच शेतमनुरांमध्ये बिबट्याबाबत मोठी दहशत निर्माण झाली आहे.
योगेश रामराव निवल यांचे रोहणापासून १ किमी अंतरावर असलेल्या सायखेडा शेतशिवारात शेत आहे. त्यांनी शेतीला पशुपालनाची जोड दिली आहे. जनावरांसाठी त्यांनी शेतातच गोठा बांधला आहे. याच गोठ्यात शनिवारी सायंकाळी त्यांनी त्यांच्या मालकीची जनावरे बांधली होती. तेथे मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने प्रवेश करून दोन वासरांना ठार केले. यामुळे शेतकर्याचे 30 हजारांचे नुकसान झाले आहे.