

वर्धा : हातात चाकू घेऊन मच्छी मार्केटे परिसरात नागरिकांमध्ये दहशत पसरविणा-या 27 वर्षीय युवकास शहर पोलिसांनी 23 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता अटक केली आहे. मुखबिरकडून मिळालेल्या माहितीनुसार इतवारा परिसरातील मच्छी मार्केटमध्ये सार्वजनिक रस्त्यावर आपल्या हातातील चाकुने प्रफुल्ल मदन तेळंगे (वय 27) रा. वल्लभ नगर पुलगाव हा शिविगाळ करत दहशत पसरवित असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वर्धा शहर पोलिसांनी इतवारा भागात दाखल होत पंचासमक्ष पंचनामा करून सदर युवकास ताब्यात घेतले. त्याच्यावर वर्धा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहे.