
सेलू : क्षुल्लक वादातून युवकावर कुऱ्हाडीने वार करीत जखमी केले. कोथीवाडा येथे ही घटना घडली. विशाल दिलीप दाडवे रा. घोराड याने संतोष वाघाडे याच्याशी वाद करीत शिवीगाळ केली. संतोषने शिवीगाळ करण्यास हटकले असता विशालने कुऱ्हाडीने मारहाण करीत त्यास जखमी केले. याप्रकरणी सेलू पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.



















































