
वर्धा : नागरिकांचे आरोग्य सांभाळणाऱ्या जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचा आगिशी खेळ सुरू आहे. आरोग्य यंत्रणेच्या एकाही रुग्णालयात नियमानुसार अम्निसुरक्षेचे (फायर ऑडिट) झाल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. आरोग्य सेवेसारख्या महत्वाच्या ठिकाणी नागरिकांच्या जिवाशी हा खेळ सुरू असल्याने तो धांबविण्याकरिता जिल्हा प्रशासनाच्या वतीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
आरोग्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर जिल्हा प्रशासनाने गंभीर असणे आवश्यक आहे. ही अत्यावश्यक सेवा असल्याने येथे महत्त्वाच्या सुविधा असणे क्रमप्राप्त ठरते. असे असताना आरोग्य यंत्रणेला अमिसुरक्षेसारख्या उपायथोजनांचे वावडे असल्याचे दिसते. जिल्हा सामान्य रण्णालयात काही महिन्यांपूर्वी आग लागलो. त्यानंतर येथे तपासणो करण्यात आलो. असलेल्या त्रुट्या दुर करण्याकरिता येथोळ अग्निशमन विभागाकडून त्यांना पत्र देण्यात आले.
मात्र, रूग्णालय प्रशासनाकडून त्यांना कुठलेहो उत्तर मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. होच अवस्था जिल्ह्यात असलेल्या उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांची आहे. या. रूणालयांनाही तसे पत्र पाठविण्यात आले. त्यांच्याकडूनही त्याचे कुठलेहो उत्तर मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभाग येथे येणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षेबाबत किती गंभोर आहे, हे दिसते. त्यामुळे जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत जिल्ह्याच्या रुग्णांच्या सुरक्षेबाबत कठोर पावले उचलाबी अशो मागणी करण्यात आली आहे.



























































