
वर्धा : विकासाच्या नावाखाली झालेल्या आणि होत असलेल्या वृक्षतोडीचे दुष्परिणाम मानवाला भोगावे लागत आहे. पर्यावरणाचे रक्षण व्हावे या हेतूने राज्य शासनाने २०२६ ते २०४६ या काळाकरिता राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून वर्धा जिल्ह्यात सुमारे ५०० हेक्टरहून अधिक क्षेत्रात विविध प्रजातींची रोपटे लावून त्याचे संगोपन केल जाणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या मार्गदर्शनात सुमारे २० यंत्रणांना सोबत घेत प्रभावी नियोजन केले जात आहे.
पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी वृक्ष लागवड व संगोपन हे गरजेचे आहे. जिल्ह्यातील विविध भागातील काही क्षेत्र सध्या ओसाड असल्याचे चित्र आहे. अशाच ओसाड क्षेत्राची निवड करून त्या क्षेत्राला हरित करण्यावर ३०० कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्ह्यातील प्रादेशिक वन विभाग, वन्यजीव विभाग व सामाजिक वनीकरण विभागाला अद्यापही ३०० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचे उद्दिष्ट प्राप्त झालेले नाही. संबंधित विभाग वगळता सुमारे २० यंत्रणांसाठी एकूण ५०० हेक्टरवर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जिल्ह्याला प्राप्त झाले आहे.
कार्यान्वयीन यंत्रणा असलेला कुठला विभाग किती क्षेत्रावर किती रोपटे लावून त्याचे संगोपन करणार हे येत्या काही दिवसांमध्ये निश्चित केळे जाणार आहे. त्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत गुरुवारी (ता. चार) विशेष बैठकही पार पडल्याचे सांगण्यात आठे. एकूणच ३०० कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५०० हेक्टरहून अधिक क्षेत्र हरित करण्याचा मानस प्रशासनाचा आहे.
वृक्ष पर्यावरणातील महत्त्वाचा घटक आहे. हरित वर्धा या हेतूने जिल्ह्यात २0२६ ते २0४६ या काळात ३00 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत मोठ्या प्रमाणात विविध प्रजातींची रोपटे लावली जाणार आहेत. या कार्यात नागरिकांनीही सहभागी व्हावे.
सुहास बढेकर, उपवनसंरक्षक,
सामाजिक वनीकरण, वर्धा.
यंत्रणांकरिता ५०० हेक्टर क्षेत्रावर वृक्ष लागवडीचे उदिष्ट जिल्ह्याला प्राप् झाले आहे. १ हेक्टर क्षेत्रावर सुमारे १ हजार १९१ रोपट्यांची लागवड निवमानुसार केली जाते. तर ५०० हेक्टरवर किमान ५.५५ लाख रोपट्यांची लागवड करून हरित वर्धा जिल्ह्याचे उदिष्ट साध्य केले जाणार आहे.






























































