
वर्धा : वर्धा – चंद्रपू- गडचिरोली विधान परिषद निवडणुकीत भाजपने केलेल्या खेळीने वेगळेच वळण आले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल आणि अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणारे हिंगणघाट येथील अंड. सुधीर कोठारी यांनी नामांकन परत घेतले. या घडामोडींमुळे या मतदार संघात भाजपचे उमेदवार अरुण लखानी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
सुमारे दोन वर्षांच्या काळानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला. त्यामुळे अनेकांकडून उमेदवारा मिळण्याकरिता चढाओढ झालो. या काळात महाविकास आघाडीकडून भाजपचे अरुण लखानी यांना संधी मिळालो. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडोच्या वतोने काँग्रेसचे शेलेश अग्रवाल यांना पक्षाकडून संधी मिळाली. तर महाविकास आघाडीचा मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हिंगणघाट अँड. सुधौर कोठारी यांनी अपक्ष म्हणून नामांकन दाखल या मतदार संघात तीन नामांकन दाखल झाल्याने येथे निवडणूक होणार असे अनेकांना वाटले होते.
परंतु. निवडणूक होण्याच्या साऱ्यांच्या आशा अखेळ फोल ठरल्या. नामांकन परत घेण्याच्या पूर्व रात्री भाजपने केलेल्या खेळीमुळे या मतदार संघात चित्र वेगळेच राहिले, अखरेच्या दिवशी काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी नामांकन परत घेतले. सोबतच अँड. सुधीर कोठारी यांनीही अर्ज परत घेतल्याने भाजपच्या लखानी यांचा मार्ग मोकळा झाल्य. भाजपने केलेल्या या खेळीपुढे काँग्रेस पुन्हा माघारलो.
मास्टर माइंड कोण
विधान परिषदेच्या या मतदार संघात घडलेल्या या घडामोडींपागे मास्टर माइंड कोण अशी चर्चा जोर धरत आहे. यात काँग्रेसचा उमेदवार वर्धा जिल्ह्यातील आवी तालुक्यातील असल्याने हा खेळ जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यानेच घडवून आणल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. पण, तो कोण या बाबतही राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा जोर धरत आहे.
नामांकन हा पूर्वनियोजित खेळ ?
वर्धा -चंद्रपूर -गडचिरोली मतदार संघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नेते आमदार विजय बडेट्रीवार यांच्या कन्या निवडणूक लढणार असल्याची चर्चा जोरात होती. यामुळे काँग्रेसकडून विशेष नावांची चर्चा झाली नाही. अशात अचानक शैलेश अग्रवाल यांचे नाव पुढे आले. त्यांच्यावतीने नामांकनही दाखल करण्यात आले आणि ते परतही घेण्यात आले. त्यामुळे नामांकन हा पूर्वनियोजित खेळ तर नव्हाता, अशा प्रतिक्रिया आता मतदार संघात उपटत आहेत. याला काँग्रेसजण कसे उत्तर देतील हा प्रश्न अनेकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
नव्या नगरसेवकांचा अनुभव हिरावला
विधान परिषदेच्या निवडणुकीकरिता मतदान करण्याचा अनुभव वेगळचा असतो, असे मतदार असलेल्या अनेक नगरसेवकांकडून बोले जाते. अशात जे जुने आहेत त्यांना याचा अनुभव आहे. परंतु, जे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते, आणि विधान परिषदेकरिता मतदान करण्याचा ज्यांचा पहिलाच अनुभव होता त्यांचा हा अनुभव झालेल्या या खेळामुळे हिरावला गेला. आता नव्या निवडणुकीपर्यंत त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

























































