Home ◼️ संपादकीय लॉटरी सेंटरच्या नावाखाली जुगार अड्डा ; पोलिसांचा छापा, दारु पकडली ! दहेगाव...

लॉटरी सेंटरच्या नावाखाली जुगार अड्डा ; पोलिसांचा छापा, दारु पकडली ! दहेगाव पोलिसांनी हमदापुरात केली कारवाई

वर्धा : ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या आड जुगार अड्डा भरवून दारु विक्रीचा गोरखधंदा पोलिसांनी उधळून लावला. या प्रकरणी दोघांना अटक करत दारु साठ्यासह इतर असा एकूण ९२ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हमदापूर येथील बसस्थानक परिसरात अर्सलन उर्फ सोनू शहा (रा. सिंदी रेल्वे) व त्याचा मित्र शंकर अमनेरकर (रा. हमदापूर) हे दोघे गावातील रहिवासी विक्की विचोरे याच्या मालकीच्या गाळ्यात शंकर ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाआड जुगार अड्डा चालवित असून, अवैधरित्या दारु विक्रीही करत असल्याचे समजले. छापा मारून दोघांना अटक करुन इतर साहित्य जप्त करत गुन्हा दाखल केला. ही कारवार्ड पोलिस निरीक्षक यशवंत कदम यांच्या निर्देशात आनंद मस्मे, ब्रम्हानंद मून, गजानन वाट, अनिल चिलगर, रुस्तुम मुंगल, मारत सातपुते आदींनी केली आहे.

संगणकावर सुरु होता जुगाराचा डाव

पोलिसांनी अर्सालन उर्फ सोतू अश्नूर शहा, शंकर गेंदलाल अमनेरकर तसेच जुगार व दारूचा व्यवसाय चालविणारे नोकर हे वेगवेगळ्या संगणकावर जुगाराचा खेळ चालवित असताना मिळून आले. तसेच दारु साठाही मिळून आला. पोलिसांनी दोन संगणक, सीपीयू, प्रिंटर, कागदी रोल, कीबोर्ड, डोंगल, जुगाराचे व दारू विक्रीचे नगदी १,७६० रुपये, लोखंडी कूलर, प्लास्टिक टब, स्टूल, प्लास्टिक खुर्ची जप्त करत दोघांसह प्रफुल्ल मेश्राम (रा. हिंगणघाट), विक्की नारायण विचोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!