

वर्धा : गरीब कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय घेत राज्य शासनाने यंदाही अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्याची योजना सुरू ठेवली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही ही योजना राबविण्यात येणार असून एप्रिलअखेर किंवा मे महिन्याच्या सुरुवातीपासून रेशन दुकानांमार्फत साड्यांचे वितरण सुरू होणार आहे.
महागाईच्या पार्श्वभूमीवर लग्नसराईच्या हंगामात कपड्यांवर होणारा खर्च मोठा असतो. अशा वेळी शासनाच्या या उपक्रमामुळे गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना शक्य नसते, त्यांच्यासाठी ही योजना उपयोगी ठरणार आहे. धान्यासह साडी मिळाल्याने रेशन व्यवस्थेवरचा विश्वास अधिक वृढ होणार असल्याचेही सांगितले जात आहे. यामुळे सामाजिक सुरक्षिततेची भावना बळकट होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लाभार्थी असल्याने वितरण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. दरम्यान, शासनाने चांगल्या दर्जाची साडी द्यावी, अशी अपेक्षा लाभार्थी महिलांकडून केली जात आहे. पुरवठा विभागाने साड्या वितरणासंदर्भात नियोजन सुरू केले असून कोणताही लाभार्थी सुटू नये, याबाबत दखल घेतली जात आहे.
वर्षाला एक मोफत साडी
अंत्योदय शिधापपत्रिकाधारक महिलांना वर्षातून एकदा मोफत साडी देण्याची तरतूद आहे. यामुळे किमान एका सणासाठी तरी नवीन साडीची सोय होते. गरीब कुटुंबांच्या खर्चात यामुळे थोडा दिलासा पिळतो.
अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी योजना
ही योजना केवळ अंत्योदय रेशनकार्डथारकांसाठी लागू आहे. अत्यंत गरीब व गरजू कुटुंबांना याचा थेट लाभ मिळतो. शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांपैकी ही एक महत्त्वाची योजना मानली जाते.

























































