Home ◼️ संपादकीय बालिकेवर केला अत्याचाराचा प्रयत्त, नराधमास नागरिकांनी दिला चोप

बालिकेवर केला अत्याचाराचा प्रयत्त, नराधमास नागरिकांनी दिला चोप

आर्वी : अल्पवयीन बालिका शौचास गेली असताना ती बराच वेळ परतली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी शोध घेतला असता बालिका नराधमाच्या ताब्यात दिसून आली. त्यामुळे नागरिकांनी त्याला विचारपूस करीत चांगलाच चोप दिला. तसेच पोलिसांना माहिती देऊन त्यांच्या स्वाधिन करण्यात आले. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास संजयनगरातील झोपडपट्टीत घडली असून, आरोपीला अटक करण्यात आली. गंगाधर धुर्वे (४५, रा पारगोठाण), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पाच वर्षीय चिमुकली शुक्रवारी शौचास गेली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी परतली नसल्याने शेजाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा ती गंगाधर धुर्वे याच्या तावडीत दिसून आली. नागरिकांनी त्याला पकडून विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी त्याला चांगलाच चोप देऊन पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर ढाले व पोलिस निरीक्षक सतीश डेहनकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथक दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेत पोक्‍्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.

अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी तातडीने गाठले घटनास्थळ

नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक करून बालिकेला सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हत्नविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांनीही घटनास्थळ गाठून पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!