
वर्धा : इृराण-इस्रायल यांच्यातल्या युद्धाचा गॅस सिलिंडरवर परिणाम होताच गुन्हेगारांनी फसवणुकीचाही ट्रेंड बदलला आहे. गॅस अपडेटच्या नावाखाली नागरिकांना लुटण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारच्या काही तक्रारी सायबर पोलिसांकडे दाखल आहेत. येत्या काळात त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मेसेज पाठवून फसवण्याचा प्रयत्न
सायबर गुन्हेगारांकहून वेगवेगळ्या बहाण्याने सर्वसामान्यांची फसवणूक होत असते. त्यात नागरिक सहजरित्या विश्वास ठेवतील अशा कारणांचा वापर होताना दिसतो. त्यानुसार आजवर बँकेची केवायसी करण्याच्या बहाण्याने, वीज बिल भरण्याच्या बहाण्याने बँक खात्यातील रक्कम लुटली जायची. अशातच गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिक चिंतीत असतानाच गुन्हेमारांनी त्यांचा ट्रेंड बदलत्ना आहे. गॅस कनेक्शन अपडेट करण्याच्या नावाखाली लोकांना मेसेज पाठवून फ़सवण्याच्या प्रयत्न होत आहे.
कुठे करायची तक्रार…
ऑनलाइन फसवणूक झाल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांकडे व बँकेकडे तक्रार करून खाते गोठवले पाहिजे. यापुळे आपल्या खात्यातून ज्या खात्यात रक्कम गेली ते खाते गोठवण्यास व गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना मदत होते. त्यासाठी सायबर पोलिसांची वेळीच मदत घेतली पाहिजे, अशा घटना घडल्यास नागरिकांनी तात्काळ सायबर सेल तसेच नजीकच्या पोलिस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
























































