दुबईतून कोकणी लोकांसाठी विशेष विमान;युनायटेड कोकण टीमचे धाडसी पाऊल

 

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर.

चिपळूण : – कोकणी माणसाने आपली भक्कम एकजूट सातासमुद्रापार दुबईत देखील दाखवून दिली आहे.गेले चार महिने दुबईत नोकरी नसलेल्या आणि लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या तरुण, जेष्टनागरिक आणि गरोदर महिलांसाठी एक विशेष विमान बुक करून त्यांना मायदेशी कोकणात पाठवण्याची व्यवस्था केली आहे.आज मंगळवारी सकाळी १० वजता हे विमान दुबईतून मुंबईसाठी रवाना झाले असून त्यामध्ये १३० कोकणी लोक प्रवास करत आहेत.विशेष म्हणजे यामध्ये२० गरोदर महिलांचा देखील समावेश आहे.कोकणातील तरुणांनी युनायटेड कोकण टीमच्या माध्यमातून हे धाडसी काम करून दाखवले आहे.
परदेशात दुबई तसेच सौदीअरेबिया तसेच अन्य आखाती भागात कोकणी तरुण मोठ्या संख्यने नोकरीवर आहेत. त्यापैकी अनेकांचे कुटुंब देखील त्याठिकाणी आहेत.मात्र कोरोना महामारीने आखाती देशाला यावेळी जबरदस्त विळखा घातला आणि त्याठिकाणी देखील लॉकडाऊन करण्यात आले.या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.तसेच हजारोजण गेले चार महिने रुममध्ये बसून आहेत.पर्यटन आणि व्हिजिट विजा वर गेलेल्यांचे विजा संपल्याने त्यांचे अक्षरशः हाल हाल झाले आहेत.त्यांची दखल अखेर कोकणी माणसांनीच घेतली आहे.
व्हाईस ऑफ कोकण या नावाने दुबईमध्ये कोकणी तरुणांचा एक ग्रुप आहे. या माध्यमातून कोकणी तरुणांची एक मजबूत टीम त्याठिकाणी अनेक उपक्रम राबवत असतात.लॉकडाऊनच्या काळात त्यांनी दुबईमध्ये असलेल्या अनेक कोकणी तरुणांना तसेच कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे.या व्हाईस ऑफ कोकण टीमकडूनच दुबईत अडकलेल्या कोकणी बांधवाना कोकणात पाठवण्याची संकल्पना पुढे आली धाडस करून कोकणी तरुण पुढे झाले.
युनायटेड कोकण टीम या नावाने त्यांनी रजिस्टर संस्था तयार केला.आणि केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार तसेच दुबईतील भारतीय दूतावास आणि दुबई सरकार यांच्यापर्यंत पोहचून अत्यंत अवघड असलेल्या सर्व परवानग्या या टीमने मिळवल्या.यामध्ये खेडचे मुख्तार पालेकर, चिपळूणचे दिलावर दलवाई,खालिद मुकादम,सबिना शेख,तसेच नजीरभाई,जुनेदभाई शेख यांनी महत्वाची भूमिका बजावली.आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यानंतर त्यांनी कोकणात जाण्यासाठी तयार असलेल्या तसेच दुबईत अडचणीत सापडलेल्या लोकांची यादी तयार करून एक संपूर्ण विमान बुक केले.त्याला सरकारने विशेषबाब म्हणून परवानगी देखील दिली.
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज मंगळवारी एक विशेष विमान सकाळी १० वजता दुबई येथून मुंबईकडे रवाना झाले.त्यामध्ये १३० कोकणी लोकअसून २० गरोदर महिला देखील आहेत.तसेच काही जेष्ठ नागरिकांचा समावेश देखील आहे.दुबईत जे कोकणी बांधव अडकून पडले होते किंवा प्रचंड अडचणीत होते त्यांनाच प्रथम या विमानुतन रवाना करण्यात आले असून सायंकाळी हे विमान मुंबई एअरपोर्टला दाखल होणार आहे.त्या ठिकाणी देखील तरुणांची एक टीम तैनात ठेवण्यात आली आहे.येत्या दोन दिवसात असेच एक विशेष विमान दुबईतून सोडले जाणार आहे.कोकणी तरुणांनी आखाती देशात दाखवलेल्या या धाडसाचे आणि सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फोटो कॅप्शन- दुबईत अडकलेल्या कोकणी बांधवाना विशेष विमानातून कोकणात पाठवण्याची अवघड कामगिरी यशस्वीपणे पार पाडणारे कोणातील हेच ते धाडसी तरुण.

दखल न्यूज भारत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here