Home जिल्हा वर्धा गावात डेंगू आजाराविषयी जनजागृती मोहीम राबवा : प्रहार जनशक्ति शाखेची मागणी

गावात डेंगू आजाराविषयी जनजागृती मोहीम राबवा : प्रहार जनशक्ति शाखेची मागणी

वर्धा : सालोड हिरापूर गावात डेंगू आजाराचे रुग्ण आढळून आले आहे. सध्यास्थिती गावात २५ ते ३० रुग्ण आहे, जास्त प्रमाणात डेंगूचा फैलाव होऊ नये यासाठी गावात जनजागृतीराबवून फवारणी करा, अशी मागणी प्रहार जनशक्ति शाखेच्या वतीने ग्रामपंचायतचे सरपंच मिलिंद देशमुख, ग्रामविकास अधिकारी श्री. तेलरांध यांना दिलेल्या निवेदनातून केली. निवेदन देतांना रुग्णसेवक सिराज पठाण, तुषार गोरे, सूरज बावणे आदीची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!