

वर्धा : दुचाकी चोरून नेणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना रामनगर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुन्हे शोध पथकाने केली. कैलास साठे, रा. बुरांडे लेआउट यांच्या मालकीची एम.एच.३२ यू, १०७० क्रमांकाची दुचाकी चोरट्यांनी गुरुकृपा लॉनसमोरून चोरून नेली होती.
याप्रकरणी रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस चोरट्यांचा शोध घेत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी चेतन प्रकाश कानेटकर रा. जुनापाणी चौक, निखिल अनिल निनावे रा. पिपरी मेघे यांना ताव्यात घेत चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली.
त्यांच्याकडून चोरीतील दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार धनाजी जळक यांच्या निर्देशात संदीप खरात, राहुल दूधकोहळे, पंकज भरणे, लोभेश गाडवे, अजय अमनंतवार, अजित सोर यांनी केली.