
सेवाग्राम : विद्युत देयकाची थकबाकी वेळीच न भरल्याचे कारण पुढे करून सेवाग्राम भागातील तब्बल २२० नागरिकांची विद्युत जोडणी कापण्यात आल्याची माहिती महावितरणचे कनिष्ठ अभियंता राष्ट्रपाल वालुंद्रे यांनी दिली आहे.
सेवाग्राम येथील महावितरणच्या कार्यालयांतर्गत ६ हजार ७०० विद्युत ग्राहक आहेत. यातील १ हजार ८३४ ग्राहकांवर विद्युत् देयकाची मोठी थकबाकी आहे. कोरोना काळात यापैकी अनेक ग्राहकांनी विद्युत देयकाचा भरणा केला नाही. वारंवार माहिती देऊनही थकित विद्युत देयक भ्ररले जात नसल्याचे लक्षात येताच
महावितरणकडून थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. याचाच एक भाग म्हणून २२० थकबाकीधारकांची विद्युत जोडणी कापण्यात आली आहे.




















































