

वर्धा : दारू पाजण्यास नकार दिल्याने व्यक्तीस रॉडने मारहाण केली. बापटवाडी चौक विक्रमशीलानगर येथे ही घटना घडली. सुभाष दिवेकर हा घरी जात असताना महेंद्र भालशंकर, गजानन घेवदे यांनी त्यास रस्त्यात अडवून तू आम्हाला दारू पाज, असे म्हणू लागले. सुभाषने दारू पाजण्यास नकार दिला असता दोघांनी सुभाषला रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.