
वर्धा : नजीकच्या लाल नाला प्रकल्पाच्या गेटसमोर असलेल्या खड्ड्यात १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी उघडकीस आली. हितेश गिरी (रा.कोरा) असे मृताचे नाव असल्याचे सांगण्यात आले. हितेश गिरी हा लाल नाला प्रकल्पाच्या गेटसमोरील खड्यांच्या काठाने जात असताना, अचानक तो पाणी भरलेल्या खड्यात पडला. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत हितेशला पाण्याबाहेर काढून हिंगणघाट येथील रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. हितेश्च्या पश्चात आई-वडील, भाऊ असा बराच आप्तपरिवार आहे. याप्रकरणी गिरड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.




























































