

मोहन सुरकार
सिंदी : संपूर्ण जगात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. शहरी तथा ग्रामीण भागही यातुन सुटलेला नाही. मात्र शहरवासीयांनो सावधान! आता डेंगु आजारही आपले पाय पसरवत आहे आणि शासकीय यंत्रणेचे सुरु आहे ‘कोरोना-कोरना’
सविस्तर वृत असे की शहरात आरोग्य यंत्रणा आणि पालिकेच्या ढिसाळ नियोजनमुळे डासांचे प्रमाण लक्षनिय वाढले असुन असंख्य जागी पाणी तुंबले असल्याने डेंगु सदृष्य डासाची निर्मिती झाली शिवाय यावर्षी पावसाचे सुध्दा सतत आगमन सुरुच आहे. त्यामुळे सर्वत्र ओलावा असुन शहरात डासांना पोषक वातावरन पाहाला मिळत आहे. परिणामता डेंगु सारखे आजार शहरात पाय पसरु लागले असुन वार्डा-वार्डात डेंगुचे रुग्ण निघु लागले आहे. मात्र सरकारी आरोग्य यंत्रणांचे याकडे काहीही लक्ष नसल्याचे दिसते. शहरातील खासगी रक्त तपासणी केंद्रात शुक्रवारी (ता.११) पासुन डेंगु चाचणीचे रुग्ण येत असुन मागील चार दिवसात १२ ते १५ रुग्ण डेंगु सदृष्य आजाराने बाधीत निघाल्याचे सांगण्यात आले. यावरुन दिवसाला चार हुन अधिक रुग्ण डेंगु बाधीत निघत असतांना सुध्दा सरकारी आरोग्य यंत्रणांचे कोरोना कोरोना चाललेय.
याला वेळीच आळा घालण्यासाठी पालिका आणि आरोग्य विभागाकडून तत्काळ आणि ठोस उपाययोजना करने गरजे आहे मात्र सरकारी यंत्रणा फक्त आणि फक्त कोरोना कोरोनाचाच जप करताना दिसत आहे.
पालिका आणि आरोग्य यंत्रणाच्या या निष्काळजीपणाच्या वागण्याने शहर लवकरच कोरोनाचे नाही पण डेंगुचा हाॅटस्पाॅट झाल्याशिवाय राहणार नसल्याने जाणवते.