Home ◼️ संपादकीय भिडीजवळ कारचा भीषण अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

भिडीजवळ कारचा भीषण अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

भिडी : नागपूर – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर भिडी जवळ आज दुपारी कारचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, कारच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे ३.४५ वाजताच्या दरम्यान वर्ध्याकडून यवतमाळकडे जाणारी कार (क्र. MH 29 BC 6989) भिडी परिसरातील क्रॉसिंगजवळील दुभाजकाला जोरात धडकली. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. सुदैवाने कारमधील प्रवासी सुरक्षित बचावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!