Home ◼️ संपादकीय धावत्या कंटेनरने अचानक घेतला पेट ; ४० लाखाचा माल जळून झाला खाक

धावत्या कंटेनरने अचानक घेतला पेट ; ४० लाखाचा माल जळून झाला खाक

हिंगणघाट : बंगळुरूवरून दिल्ली येथे पार्सल साहित्य घेऊन जात असलेल्या कॅटेनरला अचानक आग लागली. पाहता पाहता कंटेनरने पेट घेत जवळपास ४० लाख रुपयांचे पार्सल साहित्य जळून खाक झाले. ही घटना नजीकच्या लहान वणी फाट्याजवळ १४ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. एचआर. 3८ एएफ. ०६२४ क्रमांकाचा कंटेनर बंगळुरूवरून दिल्लीकडे जात होता. दरम्यान कंटेनरच्या केबिनमध्ये शॉर्टसर्किंट झाल्याने आग लागली. पाहता पाहता कंटेनरमध्ये असलेले मौल्यवान पार्सल साहित्यदेखील खाक झाले. दुपारी अडीच वाजेपर्यंत अभ्निशमन बंबाच्या सहाय्याने पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

वाहतूक पोलिसांनी दूर केली मार्गावरील कोंडी

या घटनेमुळे महामार्गावर काहीवेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक अधिकारी आवारे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून अभ्निशामन दलाला पाचारण केले, तसेच वाहतूक कोंडी दूर करत वाहतूक सुरळीत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!