Home ◼️ संपादकीय केडीएम पब्लिक स्कूलमध्ये हनुमान चालीसा पठण

केडीएम पब्लिक स्कूलमध्ये हनुमान चालीसा पठण

वर्धा : येथील केडीएम पब्लिक स्कूलमध्ये हनुमान जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम भक्तीभावाने साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सामूहिक हनुमान चालीसा पठण करत परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून टाकला. त्यांच्या सुरेल पठणामुळे शाळेत धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी सामूहिक शालेय भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!