Home ◼️ संपादकीय मेडिकल चालवताय की किराणा दुकान ; जिल्ह्यात तीन मेडिकलचे परवाने रद्द ?...

मेडिकल चालवताय की किराणा दुकान ; जिल्ह्यात तीन मेडिकलचे परवाने रद्द ? नियमांची अंपनबजावणी काहीअंशी ठरते कमकुवत : बेशिस्त विक्रेते घेतात फायदा

वर्धा : रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या आणि नियमांना धाब्यावर बसविणाऱ्या औषध किक्रेत्यांविरुद्ध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. विनाप्रिस्किप्शन औषधे देणे आणि तांत्रिक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यात जवळपास 3६ किरकोळ व घाऊक औषधविक्रेत्यांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले; तर तीन मेडिकलचे परवाने कायमस्वरूपी निलंबित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात किरकोळ व ठोक औषधविक्रेते किती?

वर्धा जिल्ह्यात सुमारे ८०० पेक्षा अधिक किरकोळ, तर १४० ठोक औषधविक्रेत्यांना परवाना देण्यात आले आहे. त्यात तालुकानिहाय नियमित तपासणी करण्याचा माग हा एफडीए विभागाचा असतो. त्यात गैर काही आढळल्यास नोटीस बजावली जाते किंवा दंडात्मक कारवाईही केली जाते.

३६ विक्रेत्यांचे परवाने तात्पुरते केलेय रदद

एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने तपासणी केली असता ३९ मेडिकल चालकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. त्यांपैकी 3६ विक्रेत्यांचे परवाने तात्पुरत्या स्वरूपात रद्द केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!