Home Breaking News अजित पवारांच्या विमानाचा अपघात, ६ जणांचा मृत्यू ; डीजीसीएची अधिकृत माहिती !...

अजित पवारांच्या विमानाचा अपघात, ६ जणांचा मृत्यू ; डीजीसीएची अधिकृत माहिती ! बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान दुर्घटना

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा पुण्यात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. लँडिंगवेळी हा अपघात झाला असून घटनास्थळी भीषण अशी परिस्थिती होती. विमानातून उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे ओएसडी आणि इतर काही जण होते असं समोर येतंय.

विमानाने लँडिंगवेळी क्रॅश होताच पेट घेतला. यामुळे विमानाचा पुढचा भाग जळून खाक झाला आहे. दरम्यान विमान अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती डीजीसीएकडून देण्यात आली आहे. तर अजित पवार यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय.

अजित पवार यांची आज बारामतीत सभा होती. या सभेसाठी अजित पवार विमानाने काही जणांसह बारामतीत आले होते. बारामतीत विमानतळावर लँडिंगवेळी ही दुर्घटना घडली. विमान अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अजित पवार यांच्या निकटवर्तीयांनी ही माहिती दिलीय. याशिवाय पाच जण या विमानात होते. अपघात कसा झाला हे समोर आलेलं नाही.

बारामती तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्ताने अजित पवार हे आज बारामतीत सभा घेणार होते. त्यासाठी विमानाने ते नेहमीप्रमाणे बारामतीला येत होते. बारामती विमानतळावर विमान उतरविण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने हे विमान आदळल्याने त्या विमानाला आग लागली, असे प्रथमदर्शनी समजते आहे.

अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील गंभीर जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलीस व मदत यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. हा अपवाद नेमका कशामुळे झाला याची माहिती मिळत नाही, मात्र वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघातामुळे बारामती परिसरात खळबळ माजली असून बारामतीकरांनी अपघात ग्रस्त ठिकाणाकडे धाव घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असून अजित पवार यांची तब्येत कशी आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वांची धडपड सुरू आहे या घटनेने बारामतीकरांना कमालीसा धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!