हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई ! विदेशी दारूची वाहतूक उधळली ; २.७९ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

हिंगणघाट : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, हिंगणघाट यांच्या पथकाने अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करत तब्बल २ लाख ७९ हजार रुपयांचा विदेशी दारूचा साठा पकडला. ही कारवाई गुप्त माहितीवरून करण्यात आली. ही घटना हिंगणघाट परिसरात घडली. पोलीस पथक गस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमी मिळाली की MH 32 Q 221 क्रमांकाची चारचाकी गाडी मौजा नागरी (जि. चंद्रपूर) येथून हिंगणघाटकडे विदेशी दारू घेऊन येत आहे. त्यानुसार पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली. काही वेळातच ही गाडी त्या ठिकाणी आली आणि पोलिसांनी तिला थांबवले.

गाडीत पाहणी केली असता, रॉयल स्टॅग आणि कार्ल्सबर्ग या कंपन्यांची विदेशी दारू आढळली. गाडीतील आरोपींनी आपली नावं आमिर पठाण व शुभम तोडासे (दोघेही रा. निशानपुरा वॉर्ड, हिंगणघाट) अशी सांगितली. त्यांनी सांगितले की हा माल दीपक चौधरी याच्या सांगण्यावरून आणला होता. पोलिसांनी गाडी, दारू व बिअरसह एकूण २.७९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात पो.उपनिरीक्षक प्रेमराज अवचट आणि त्यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here