
देवळी : देवळी येथे बसचा थांबा नाहीच असे म्हणत रापमच्या चालक आणि वाहकाने विद्यार्थिनींसोबत अरेरावी केली. या प्रकरणी ठोस माहितीअंती चालक व वाहकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
नागपूर ते नांदेड बसचा देवळीला थांबा नसल्याचे कारण सांगून राज्य परिवहन महामंडळाचे बस चालक व वाहकाने शालेय व कॉलेजच्या युवतींसोबत हुज्जत घातली. वर्धा स्थानकावर ही अरेरावी करून त्यांची अडवणूक करण्यात आली. त्यानंतर संतप्त विद्यार्थिनींनी संबंधित बस थेट पोलिस स्थानकात आणून संबंधितांच्या विरोधात तक्रार नोंदविली. या गंभीर प्रकरणी पोलिस स्टेशनचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सत्याची पडताळली करून वाहक भरत रमेश पराते त चालक संजय राजेश मेहत्रे यांना निलंबित केले आहे. विशेष म्हणजे विद्यार्थिनींशी अरेरावी केलेल्या प्रकरणी संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे यांची मदत घेऊन दोर्षींवर कठोर कारवाईसाठी प्रकरण लावून धरण्यात आले होते.




















































