

वर्धा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुबंई यांच्या सुचनेनुसार हक हमारा भी तो है या योजनेअंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने जिल्हा कारागृह येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला सह दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर व्हि.एन.ठाकूर, समाजसेवक पी.डी.गौतम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, जिल्हा कारागृह अधिक्षक एस.आर.पवार, वरिष्ठ तुरुगांधिकारी एस.पी.नागमोते, तुरुगांधिकारी संघमित्रा शेळके अधिवक्ता यास्मिन शेख, अनिता ठाकरे
आदी उपस्थित होते. या कायदेविषयक जनजागृती शिबिरात सह दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर व्हि.एन. ठाकूर यांनी कैद्यांचे अधिकार व मोफत विधी सहाय्य याबाबत मार्गदर्शन केले. तर समाजसेवक पी.डी.गौतम यांनी प्रत्येक मानवाला सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. आपले पुढील जीवन सुंदर बनविण्यासाठी चांगल्या अध्ययनावर भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
विवेक देशमुख यांनी कैद्यांचे मुलभूत अधिकार व कायदेविषयत सेवा बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. अनिता ठाकरे व यास्मिन शेख यांनी कैद्यांच्या विविध समस्यांवर विधी सहाय्यामार्फत कसा तोडगा काढता येईल याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कायदयाचे ज्ञान घेणारे विधी महाविद्यालयातील विद्यार्थी व विधी स्वयंसेवक, कर्मचारी व कारागृहातील कैदी बांधव उपस्थित होते.