

वर्धा : रोडच्या बाजूला उभ्या असलेल्या टँकरला मागून दुचाकीचालकाने धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना सेलू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नॅशनल हायवे क्र. 361 कान्हापूर ते पवनार दरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार, संदीप गरजे (32) रा. पाठसरा ता. आष्टी हा आपल्या ताब्यातील ट्रॅकर क्र. एम. एच. 20 ईएल 0170 हा घेवून जात असता कान्हापूर ते पवनार दरम्यान टँकर रोडचे बाजूला उभा करून ठेवला. दरम्यान कोणीतरी अनोळखी दुचाकी क्र. एम. एच. 32 यु. 9364 च्या चालकाने टँकरला मागून धडक दिली. दुचाकीसह रोडचे बाजूला पडलेला दिसला. याप्रकरणी संदीप गरजे यांच्या तक्रारीवरून सेलू पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.