

वर्धा : एक व दोन रुपयांचे नाणे चलनात महत्वाचा दुवा असला तरी बँक व्यापारी हे नाणे घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना अडचणीचासामना करावा लागत आहे. रोजंदारी, मजूर, कामगारांना व्यापारी, कास्तकार मजुरी देताना चलनातील नोटा तसेच नाणी देतात. त्यामुळे मजुरांसह नोकरदार आवश्यक जीवनावश्यक वस्तु,पेट्रोल, भाजीपाला तसेच इतरही वस्तुची खरेदी करताना हे नाणे देतात. परंतु दुकानदार 5 ते 10 दहा रुपयांचे नाणे स्विकारतात परंतू एक व दोन रुपयांचे नाणे स्विकारण्यास नकार देतात.
पेट्रोलपंपावर तर नाणे स्विकारत नाही. व्यापारी, पेटोलपंप चालक या नियमांना न जुमानता नागरिकांची पिळवूणे करीत आहे. जागरुक नागरिक एक व दोन रुपयांचे नाणे घेण्यावरून वाद घालून नाणे स्विकारण्यास भाग पाडतात. परंतु अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. दुकानदार किंवा पेटोलपंप किंवा इतर व्यापा-यांचे असे म्हणणे आहे की, आम्ही नाणे घेण्यास नकार दर्शवित नाही. परंतु दिवसभरात जमा झालेले नाणे दुसरे दिवशी बॅकेज जमा करण्यास गेल्यास बॅकेत ते स्विकारल्या जात नाही. जर बॅकने नाणे स्विकारले तर एक व दोन रुपयांचे नाणे घेण्यास अडचण नाहो.