Home Breaking News हिंगणघाट पोलिसांची मोठी कारवाई : 10.72 लाखांचा अवैध दारू साठा जप्त

हिंगणघाट पोलिसांची मोठी कारवाई : 10.72 लाखांचा अवैध दारू साठा जप्त

हिंगणघाट : दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत हिंगणघाट उपविभागीय पोलीस कार्यालयाने ८ एप्रिल २०२६ रोजी मोठी कारवाई करत अवैध विदेशी दारू वाहतूक उघडकीस आणली. खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी हिंगणघाट-नागरी मार्गावरील मौजा मानोरा फाटा येथे नाकेबंदी केली असता पांढऱ्या रंगाची हुंडई क्रेटा (MH 40 BC 0019) ही कार अडवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनाच्या मागील सीटखाली व डिकीत बडवायझर मॅग्नम कंपनीच्या ५०० मिलीचे एकूण २४० टीन डबे (१० खोक्यांमध्ये) असा अवैध दारू साठा आढळून आला.

यावेळी वाहन चालक मोहम्मद अशरफ उर्फ गुड्डू मोहम्मद कलीम खोकर (रा. शिवाजी वॉर्ड, हिंगणघाट) तसेच त्याच्यासोबत असलेला अनुराग राजेश नंदागवळी (रा. महात्मा फुले वॉर्ड, हिंगणघाट) यांना ताब्यात घेण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत ७२ हजार रुपये असून वाहनासह एकूण १० लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. घटनास्थळी पंचनामा करून आरोपींविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल व अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या सूचनेनुसार पार पडली. या मोहिमेत पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, चेतन पिसे, रवींद्र घाटुर्ले, उमेश लडके, राहुल साठे, सतीश घवघवे, PSI प्रेमराज अवचट, ASI गोविंद हदवे तसेच पोलीस शिपाई भारत भूटलेकर व अनंत हराळ यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!