


वर्धा : रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी व रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी ४० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदात्यांनी राक्तदान केले तसेच ९७ नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा राजू मेढे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी मेघल अनासने, मोटर परिवहन विभाग वर्धाचे पोलिस निरीक्षक देवानंद पाटील, राज्य परिवहन विभागाचे प्रतापसिंह राठोड, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉ. शिवली कलोडे, याची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अपघातानंतर अपघात झालेल्या रुग्णाला रक्ताची कशाप्रकारे गरज भासते आणि नागरिकांनी केलेल्या रक्तदानातून कशाप्रकारे रुग्णांचे प्राण वाचते याचे महत्त्व यावेळी पटवून देण्यात आले. तसेच रस्ता रस्त्यावरील अपघातांचे प्रकार याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक प्रिती परळकर, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथील मोटर वाहन निरीक्षक प्रफुल मेश्राम, संदीप मुखे, अजय चौधरी, साधना कावळे, सहायक मोटर वाहन निरीक्षक विशाल भगत, अक्षय मालवे, आदित्य ठोक, अमर पखान, राहुल ढोबळे व कर्मचारी वर्ग आणि वर्धा जिल्हातील सर्व ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक यावेळी उपस्थित होते.