आपसी वैमनस्यातून चाकूहल्ला! एकास अटक; दोन आरोपी फरार

हिंगणघाट : आपसी वैमनस्यातून एकावर चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना येथील संत चोखोबा वार्डामध्ये शुक्रवारी सांयकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान घडली. संत चोखोबा वार्डातील शेजारी राहणारे संतोषसिंग भादा व मधुसिंग सेबासिंग भादा परिवारात स्स्ता बंद कां केला या कारणावरुन सकाळी वादविवाद झाला. या वादविवादाचे पडसाद सायंकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान दत्तमंदीर मेन रोड परिसरात सुडभावनेने आकास्मिकपणे गुरुनामसिंग मधुसिंग भादा यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करीत त्यास जखमी केले. याविषयीची फिर्याद वडील मधुसिंग सेबासिंग भादा यांनी पोलिस स्टेशनला दिली. या प्रकारणी आरोपी संतोषसिंग उत्तमसिंग भादा (वय 41) यास पोलिसांनी अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here