पवनार येथे शिवचरित्रावर पोवाड्याचे आयोजन! शाहीर तोडकर यांची उपस्थिती

पवनार : येथील शिवसेना, युवा सेना शाखेच्या वतीने दरवर्षी तिथीनुसार शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सोमवार (ता. २१) येथील बाजार चौकात शिवसेना युवा शाखेच्या वतीने आयोजीत सांस्कृतीक कला मंच, मिरज प्रस्तुत शाहीर दौलत शाहीर रामलिंग तोडकर यांचे शिवचरित्रावर पोवाड्याच्या कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमात गावातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना शाखाप्रमुख संदीप हिवरे, युवा सेना तालुका अधिकारी राहुल पाटणकर यांच्यासह शिवसैनिकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here