

मोहन सुरकार
सिंदी (रेल्वे ) : येथील श्रेणी-अ मध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद संचालित पशु वैद्यकीय दवाखान्यावर सिंदी टाऊन आणि लगतच्या सहा गावाचे कार्यक्षेत्र असुन सन २०१३ साली झालेल्या पशु जनगणने नुसार ३५०० जनावरे असून या कार्यक्षेत्रातील सर्व जागी लंम्पी या नव्यानेच उद्भवलेल्या आजाराने उच्छांद मांडला असतांना शासनातर्फे केवळ ५०० लशी प्राप्त झाल्यांने लस कोणाच्या जनावराला द्यायची आणि कोणाच्या नाही अशी अडचण निर्माण झाली आहे. परिणामी परिसरातील अनेक पशु पालक, गोपालकांनवर आपली जनावरे वाचविण्यासाठी खाजगी वैद्यकीय उपचाराची आर्थिक झड सहन करण्याची वेळ आली आहे.
मागील काही दिवसांपासून नव्यानेच पाहाला मिळत असलेल्या जनावरावरील नविन आजार ज्याला आरोग्य भाषेत “लंम्पी ” असे संबोधल्या जाते त्यांने पुर्ता उच्छांद मांडला असुन संसर्गजन्य या आजारात जनावराला मोठा ताप येतो, पाय सुजतात आणि शरीरावर गाठी येतात नंतर या गाठी फुटुन येथे जखमा होतात. उच्च तापामुळे जनावर चारापाणी खाणे बंद करते आणि लंघवीवाटे रक्त येते औषध उपचार व्यवस्थित झाला आणि जनावराने उपचाराला प्रतिसाद दिला तर ठीक नाहीतर जनावराचा मृत्यू देखील होतो.
अशा महाभंकर आजाराने परिसरात हाहाकार माजवला आहे. असंख्य जनावर या आजाराच्या विळख्यात आली असून बरीच दगावली आहे.
शासकीय यंत्रणेचे नेहमीप्रमाणे वराती मागुन घोडे दामटवीण्याचा प्रकार आजही या हाॅयटेक जगात सुरु असुन त्याबद्दल आश्चर्य वाटायला नको. या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होण्यास दोन महीण्याहुन अधिक कालावधी लोटला. शहरात लम्पी प्रतिबंधक लस यायला महीना लागला या काळात अनेक शेतकर्यांची जनावरे या रोगाने बाधीत झाली. नविनच रोग असल्याने निदान व उपचाराची दिशा ठरता ठरता वैद्यकीय अधिकाऱ्यांची दमछाक झाली. यात बराच वेळ गेलामुळे हा आजार परिसरात चांगलाच फोफावला होता उपचारादरम्यान विवीध औषधाची चाचपणी करतांना आजार वाढला आणि बरीच जनावर मृत्यूमुखी पडली.
आता कुठे २ सप्टेंबर रोजी स्थानिक पशु वैद्यकीय दवाखान्यात ५०० लशी उपलब्ध झाल्या मात्र शहरातील मुख्य व्यवसाय शेती असल्याने सिंदी शहरात पशु पालक शेतकरी आणि त्यांच्याकडे असलेली जनावरांची मोठी संख्या आहे शिवाय तान्हा आणि बैल पोळ्यासाठी विदर्भ प्रसिध्द असणाऱ्या सिंदी शहरात दोन ते तीन लक्ष रुपये किमंतीच्या बैलजोड्या बहुसंख्येने पाहायला मिळतात ऐवढ्या मोठ्या सिंदी टाऊन आणि लगतच्या हेलोडी, बेलोडी, दिग्रज, पळसगाव, परसोडी, पीपरा, या सहा गावात पाचसे लशी कशा पुरणार असा प्रश्नच आहे.
यावरुन सरकारी यंत्रणा किती सजग आहे याची प्रचिती येत आहे. शिवाय या लसीचे १०० मी.ली. चे संयुक्त पँकिंग राहते व प्रत्येक जनावराला ०१ मी .ली या प्रमाणे लसीचा डोज द्यायचा असुन एकदा शंभरचा पॅक फोडला तर तो चार तासात शंभर जणावराना उपयोगात आणता येतो अन्यथा तो शिल्लक साठा वाया जातो.
पशु पालक अगोदरच कोरोनामुळे आर्थिक कोंडीत सापडला आहे. पाच महीण्यापासुन हाॅटेल आणि चहा व्यवसाय बंद असल्याने दुधाला ग्राहक नाही. दुग्ध संकलन केंद्रात दुग्ध उत्पादकाचे पुर्ण दुधच घेतल्या जात नोव्हते आणि जे अल्पशे घेतले जात होते त्याचाही दर अत्यंत कमी दिल्या जात आहेत. याशिवाय शेतीची सुध्दा फार वाईट अवस्था आहे सोयाबीन या नगदी पीकाने परिसरातील शेतकऱ्यांना दगा दिल्याने चांगलीच अडचन झाली आहे. अशा परिस्थितीत जनावरावर आलेल्या या रोगाने पशु पालक शेतकरी आणि गोपालकाचे कंबरडेच मोडले आहे.
प्रतिक्रिया….
याबाबत सिंदी पशु वैद्यकीय दवाखानात विद्यमान कार्यरत असलेले श्री दंडारे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की आज गुरुवारी (ता.२४) तीनशे लशी नव्याने उपलब्ध झाल्या असुन शहरातील उर्वरित जनावरांना लस टोचून घेणे करिता शनिवारी (ता.२६) आपल्या दवाखान्यात शिबीर आयोजित केले आहे या शिबिराचा जास्तीत जास्त पशु पालकांनी लाभ घ्यावा. फक्त लशीकरणासाठी कोणीही बाधीत जणावरे न आणता ज्यांना लागन झाली नाही ती आणावीत.
ऐ एन दंडारे,लाईट स्टाक सुपरवायझर