
मांडगाव : अधिक मासानिमित्त वणा नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या वडील, मुलशी आणि तिच्या मैत्रीणीचा शुक्रवारी दुपारी पाण्यात बहून मृत्यू झाला होता. या तिघांच्याही पार्थिवावर शुक्रवारी रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अतुल लक्षमण किनकर (9), रिद्धिमा अतुल किनकर (१६), रा. शेडगाव (आजदा) आणि श्रावणी उर्फ गुंजन रमेश मेश्राम (१६), रा. सुकनेगाव, ता. वणी, जि. यवतमाळ, अशी मृतांची नावे आहेत.
हे तिघेही शुक्रवारी दुपारी शेडगाव येथील वणा नदीवर आंघोळीला गेले होते. नदीपात्रात रेती उपशामुळे पडलेल्या खड्यांतील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. ही वार्ता गावात पसरताच नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला. उपस्थितांची मने सुन्न झाली. तिघांचेही मृतदेह हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे शुक्रवारी रात्री उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मध्यरात्री शोकाकुल वातावरणात तिघांच्याही पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आता मृतांच्या कुटुंबियांना मदत मिळणार का?
मृत अतुल किनकर मनमिळावू स्वभावाचे होते. एकाच ठिकाणी, एकाच वेळी, एकाच गावातील तिघांचा असा अंत होईल, याची कल्पनासुद्धा कोणी केली नव्हती. किनकर कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. त्यापुळे नातेवाईक व गावकऱ्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यापूर्वी नुकसान भरपाईची मागणी लावून धरली होती. आता प्रशासन मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाला आर्थिक मदत देईल का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
चूल पेटलीच नाही, रात्रभर डोळाही लागला नाही
शुक्रवारी रात्री गुंजनच्या पार्थिवावर वणा नदी तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अतुल किनकर आणि रिद्धिमा यांच्या पार्थिवाला एकाच चितेवर राजी १२.०३ वाजता पुखागनी देण्यात आला. यावेळी वणा नदी तीरावर पोठ्या संख्येने गावकऱ्यांनी जड अंतःकरणाने त्यांना निरोप दिला. या दुःखद घटनेने शुक्रवारी गाबातील चुली पेटल्याच नाहीत. गुंजनच्या अंत्यसंस्काराला राञी उ वाजले होते. गावकऱ्यांनी राज अक्षरश; जागून काढली. कोणाच्याच डोळ्याला डोळा लागला नाही.


























































