

सेलु: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘माहेर शांती निवास’ येथे विविध उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आले. भारत कल्याण बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रजत पाटील यांच्या हस्ते येथील नागरिकांना व उपस्थितांना शीतपेय वाटप करून ही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
१४ एप्रिल रोजी आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शेळके साहेब आणि सेवानिवृत्त सिद्धार्थ पाटील सर उपस्थित होते. कडाक्याच्या उन्हात शीतपेय वाटपाचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबवण्यात आला. याप्रसंगी विशालभाऊ रंगारी, आयुष धनवीज, उमंग शिंदे, पवन अहाके विकेश पाटील यांसह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना उजाळा देत आणि सामाजिक सलोखा जपण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
























































