अपघातात सासरा ठार, जावई गंभीर! देऊरवाडा ते सर्कसपुरा टीपाईटवरील घटना

देऊरवाडा : वरून सर्कसपूरला दुचाकीने सेंट्रीग आणण्यासाठी जात असताना भरधाव वेगात येणा-या कारचालकाने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील सासरा ठार झाला तर जावई गंभीर जखमी झाल्याची घटना देऊरवाडा ते सर्कसपूर टी-पॉईंटजवळ घडली. पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन गजबे यांची दुचाकी क्र. एम.एच. 32 एफ 5158 ने नितीन गजबे व देविदास नेवारे हे देऊरवाडावरून सर्कसपूरला सेंट्रींग आणण्यासाठी जात होते.

दरम्यान, एका इंडिका कारच्या चालकाने कार भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात देविदास नेवारे व नितीन गजबे दे दोघेही गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमींना आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. देविदास नेवारे यांच्या डोक्याला जबर दुखापत असल्याने त्यांना सेवाग्राम रुग्णालयात रेफर केले. तेथेही घेतले नसल्याने नागपूर येथील मेडिकल काँलेजमध्ये दाखल केले. परंतु, तेथील डॉक्टरानी तपासून मृत घोषित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here