Home Breaking News भरधाव कार राँग साईडने येऊन एसटी बसला धडक ; चालक गंभीर जखमी...

भरधाव कार राँग साईडने येऊन एसटी बसला धडक ; चालक गंभीर जखमी ! मामा-भांजा दर्ग्याजवळची घटना

वर्धा : नागपूरकडून वर्धेकडे येणाऱ्या एसटी बसला भरधाव वेगाने राँग साईडने आलेल्या कारने समोरून धडक दिल्याची घटना शनिवारी (दि. ७) सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास पगार जवळील मामा-भांजा दर्ग्याजवळ घडली. या अपघातात कारचा चालक गंभीर जखमी झाला असून बसचेही मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-४०-वाई-५३०९ क्रमांकाची एसटी बस नागपूरकडून वर्धेकडे येत होती. त्यावेळी मामा-भांजा दर्ग्याजवळ अचानक भरधाव वेगात राँग साईडने आलेल्या एमएच-३२-एएस-९९३० क्रमांकाच्या कारने बसला समोरून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला.

या अपघातात एसटी बसच्या समोरील भागाचेही नुकसान झाले. बसमधील प्रवाशांना मात्र सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. कारचा चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतकार्य केले. वृत्त लिहीपर्यंत जखमी चालकाचे नाव समजू शकले नव्हते.

टिप : एसटी बस व कारच्या अपघाताचे प्रातिनिधिक चित्र.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!