भरधाव ट्रक दुभाजकास धडकत जळून खाक ; कान्हापूर जळील घटना : वाचा सविस्तर

पवनार : छत्तीसगडवरुन वाळू घेवून यवतमाळ जिल्ह्यात जाणार्या ट्रकचे इंजिन गरम आल्याने या ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना वर्धा नागपूर मार्गालगत असलेल्या कान्हापूरजवळ मंगळवार (ता. २०) रात्री दीड वाजताच्या सुमारास घडली. मोबम्मद शरीफ मोहम्मद शफी वय ४६ रा. वाढोना बाजार ता. राळेगाव जिल्हा यवतमाळ वाहक सलमान खान हा अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर सेवाग्राम रुग्णालात उपचास सूरु आहे.

एमएच ३२ एजे ४४५३ या क्रमांकाचा ट्रक छत्तीसगडवरुन वाळू घेवून यवतमाळ जिल्ह्यात जाण्याकरीता भरधाव वेगात येत होता. दरम्यान कान्हापूरजवळ या ट्रकचे इंजिन गरम होवून त्याने अचानक पेट घेतल्याने चालकाच्या लक्षात येताच ट्रकचालकाने ट्रक थेट रोडच्या बाजूला असलेल्या नाल्याच्या कठड्यावर चढविला. या अपघातात ट्रकचा चेंदामेंदा होवून ट्रक पलटी झाला. मात्र ट्रकने यानंतर चांगलाच पेट घेतल्याने आग नियंत्राणाबाहेर गेल्याने ट्रक जळून खाक झाला.

गावालगतच्या नागरीकांनी हा बर्निंग ट्रकचा थरार पाहिल्याने त्यांच्यात चांगलीच धडकी भरली होती. घटनेच्या एका तासानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या आल्यानंतर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र तोपर्यंत ट्रक जळून बेचिराख झाला होता. सेलू पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here